बारामती: येथील भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदी राणी जगताप यांची तर सचिवपदी पल्लवी भुते यांची निवड करण्यात आली. बारामतीतील महिलांसाठी विधायक उपक्रम राबविण्याचे काम भगिनी मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सहसचिव- कविता यादव, खजिनदार- सीमा चव्हाण व अनिता खरात, प्रमुख विश्वस्त- सुनीता शहा, सल्लागार- संगीता काकडे, कार्यकारिणी सदस्य- मृदुल देशपांडे, सुचित्रा गांधले, दीपा महाडिक, आरती सातव, बिजल दोशी, स्नेहा गाढवे, मेघना गुगळे, कीर्ति हिंगणे, पूनम पवार, वंदना मोहिते, रूमा जोशी, प्रीती पाटील, लीना बालगुडे, मनीषा मत्रे, वृषाली पांडकर.
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार भगिनी मंडळाच्या सदस्या व त्यांचे कुटुंबीय कोविड काळात रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने रक्तदान करणार आहेत. लवकरच हे रक्तदान शिबिर होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष राणी जगताप यांनी दिली. या शिवाय वृक्षलागवड व संगोपनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माझे झाड माझा सेल्फी हाही उपक्रम राबविला जात आहे.
१६०४२०२१-बारामती-१०