मेडिकल असोसिएशनची निवड प्रक्रिया इंदापूर येथील नीतू मांडके आय.एम.ए हाऊस इंदापूर येथे कार्यक्रम घेऊन पार पडला. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. के. इनामदार, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. लहू कदम, डॉ. संजय देशमुख, डॉ. नामदेव गार्डे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. शिंदे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. समीर मगर, डॉ. मनोज वाघमोडे, डॉ. अमोल रासकर, डॉ. श्रेणीक शहा आदी मान्यवर होते.
तर यावेळी डॉ. संजय शहा, डॉ. आर. आर. शिंदे, डॉ. हेगडे, डॉ. रेणूरकर, डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. अतुल वनवे, डॉ. मंगेश पाटील, महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. राम अरणकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद खाडे, डॉ. समीर मगर, डॉ. ज्योती कर्सर, डॉ. सचिन बिचकुले, डॉ. अमोल खानावरे, डॉ. दत्ताजी गार्डे, डॉ. ऋषिकेश गार्डे, डॉ. अनिरुद्ध गार्डे, डॉ. शिवाजी खबाले, डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. सुधीर तांबिले, डॉ. अभिजित ठोंबरे आदी डॉक्टर मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यात मागील दहा-पंधरा वर्षांपूर्वी आरोग्य सेवा पाहिजे तेवढी, अद्ययावत व उत्तम देण्यामध्ये खूप मोठी अडचण होती. मात्र, मागील दहा वर्षांत इंदापूर तालुक्यात विशेषतः इंदापूर शहरात आरोग्य सेवा हायटेक झाली असून, यामध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर यांचे खूप मोलाचे योगदान आहे. इथून पुढेही अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही इंडियन मेडिकल असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. अविनाश पाणबुडे यांनी दिली.
इंदापूर येथे मार्गदर्शन करताना नूतन अध्यक्ष डॉ. अविनाश पाणबुडे व मान्यवर.