बारामती : माळेगावचे अध्यक्ष सभासदांना विसरले. कांड्या पेमेंटची पद्धत बंद केली. त्यांची सद्दामशाही सुरू आहे, अशी टीका करीत माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी घरचा अहेर दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारादेखील त्यांंनी दिला आहे.
सहकार बचाव शेतकरी कृती समितीच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे. माळेगाव कारखान्याच्या सत्ताधाºयांच्या कारभारावर बोट ठेवल्याने तज्ज्ञ संचालक अविनाश गोफणे यांचे पद काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या अध्यक्षांनी दबाव टाकून काही जणांना ही मागणी करण्यास भाग पाडल्याचा संचालक गोफणे यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोफणे यांच्यासह डिस्टीलरी चेअरमन अविनाश देवकाते, ज्येष्ठ संचालक सुरेश खलाटे, संचालक विलास देवकाते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, माजी उपाध्यक्ष रामदास आटोळे, माजी संचालक राजेंद्र बुरुंगले, लक्ष्मण जगताप, तुकाराम गावडे, हर्षल कोकरे यांनी कारभारावर टीका केली. त्यांनी सांगितले, की २००७मध्ये ७ संचालक निवडून आले, त्या वेळी अनेक आंदोलने केली. तत्कालीन कार्यकारी संचालकांनी साखरविक्रीमध्ये गफला केल्याचा आरोप केला; परंतु संचालक मंडळ सत्तेत आल्यावर त्यांच्यावर का कारवाई केली नाही, असा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष व त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगून दिशाभूल करून सभासदांच्या डोक्यावर सुमारे ७० कोटींचा बोजा कशासाठी ठेवला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही संचालकांसह एकेकाळी विद्यमान अध्यक्षांच्या निकट असणाºया सहकाºयांनी कारखान्याच्या कारभारावर ताशेरे ओढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सध्या माळेगाव कारखाना चर्चेचा विषय ठरला आहे....पांडुरंगाने त्यांना सुबुद्धी द्यावीभ्रष्टाचाराचा उच्छाद मांडलेला असताना हाताची घडी घालून गप्प बसायचे का? असा सवाल गोफणे यांनी केला. माझी भूमिका सत्ताधाºयांना अडचण ठरत असल्याने दबाव टाकून वरिष्ठांकडे माझ्या विरोधात तक्रार करून माझे शासन नियुक्त पद घालविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे तज्ज्ञ संचालक अविनाश गोफणे यांनी सांगितले.कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना बगॅसची बचत होणे गरजेचे होते. मात्र, कारखाना चालविण्यासाठी उलट बाहेरून बगॅस घ्यावा लागला. त्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले. पांडुरंगाने सभासदांच्या हितासाठी सत्ताधाºयांना सुबुद्धी द्यावी, असा टोला माळेगाव डिस्टीलरीचे चेअरमन अविनाश देवकाते यांनी या वेळी लगावला.