याबाबत भैरवनाथ मारुती शिंदे (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे हे सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी गेले असता पेट्रोल भरून येत असताना अवसरी फाटा येथे एका अज्ञात इसमाने दुचाकीवर मागून येत थांबविले व शिंदे यांना म्हणाला आमच्या साहेबांनी शिट्टी मारली असता तुम्ही का थांबले नाही. तुमच्याकडे गांजा असण्याचा आम्हाला संशय येत आहे. असे म्हणत दमबाजी करत त्याने शिंदे यांच्या वाहनाची डिकी, खिसे चेक करत, वाहनाची कागदपत्रे मागितली व धमकी देऊन शिंदे यांच्याकडे असणारे गळ्यातील दोन तोळ्याची चेन व साडेसात ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली. एकूण अंदाजे १ लाख ४0 हजार रुपयांचे सोने चोरट्याने लंपास केले आहे. याप्रकरणी शिंदे यांची फसवणूक झाली म्हणून त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी याच पद्धतीने मंचर येथील पिंपळगाव फाट्यावर दोन युवकांची अशाच प्रकारे लुबाडणूक केली असल्याकारणाने मंचर पोलिसांनी सदर वाहन चालकाचा शोध अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीद्वारे करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
पोलीस असल्याचा बहाणा करत अंगठी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:10 AM