पुणे : देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी पुण्यातील नागरिकाने अॅक्सिप्रिव्हेंट प्रणाली विकसित केली आहे़ अॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम वाहनावर बसविल्याने रस्त्यावरील अपघातांची संख्या आणि जीवितहानी या शक्यता अगदीच नगण्य होऊ शकतील़अरुण बंडी यांनी ही सुरक्षित ओव्हरटेकिंगसाठी प्रणाली बनविली आहे़ याबाबत बंडी यांनी सांगितले की, कोणत्याही अपघातात शक्यतो दोनच वाहने प्रामुख्याने आढळतात़ ओलांडून पुढे जाणाऱ्या क्रियेमध्ये जास्तीतजास्त ३ वाहने बाधित होऊ शकतात़ सद्यस्थितीत ओव्हरटेकिंगची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही़ तीनही वाहनांना गती सावकाश करणे किंवा थांबविणे या तीनही स्थितीबद्दल, कोण, केव्हा व कोणत्या क्षणी बदल करणार आहे, याची नक्की खात्री किंवा पूर्वकल्पना येणारी कोणतीही प्रणाली सध्याच्या प्रचलित वाहनांत नसल्याने एकमेकांच्या गतिशीलतेतील बदलासंबंधीची सूचना एकमेकांना खात्रीने देता न आल्याने त्यांच्यातील समन्वय चुकतो आणि प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता वाढते़ अॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम हा अंदाज चुकण्याच्या स्थितीला पूर्णपणे विराम देऊन तिन्ही वाहनचालकांना व इतर सर्वांनासुद्धा त्यांच्या बदलणाऱ्या हेतूंची आणि त्यायोगे आपल्या गतिशीलतेतील होणाऱ्या बदलाची जाणीव अचूकपणे करून देत आणि अपघाताची शक्यताच नष्ट करते़
ओव्हरटेकच्या अपघातांना अटकाव
By admin | Published: April 24, 2017 5:00 AM