शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडल्याप्रकरणी १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:09 AM

मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले...

ठळक मुद्देबेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

आसखेड: भामा आसखेड धरणावरून पुण्याला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धरणग्रस्तांनी सोमवारी( दि.३१ ) बंद पाडल्याने सायंकाळी सुमारे १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली. पैकी १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले , अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

   भामा आसखेड धरणामधून पुण्याला देण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम (दि.१४ ऑगस्ट ) पोलीस बंदोबस्तात सुरू केले होते. परंतु, विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे कित्येक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीचे पाईपलाईनवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. याप्रकरणी २७ जणांवर कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरणातून पुणे शहराकडे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन केली जात आहे. त्याचे काम सुरु आहे. खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे या पाइपलाइनचे काम सुरु आहे. कामाच्या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी केली.  आणि गबाजी सातपुते या वृद्धास गाडीच्या दरवाज्याच्या बाजूला हेतुपूर्वक ढकलून देऊन मारण्याच्या प्रयत्न आंदोलकांनीच केला अश्या आरोपाने तसेच तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई के .यू .कराड आणि सहाय्यक फौजदार एस .आर .वाघुले यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

यामध्ये पोलीस कर्मचारी कराड यांच्या गणवेशाची बटणे तुटली. तर सहाय्यक फौजदार वाघुले यांच्या हाताला व पायाला मार लागला. आंदोलकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी १८  जणांना अटक केली आहे. १८ पैकी ९ जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.  तर अजय नवले(रा. वाहागाव ता. खेड), शिवाजी राजगनरव(रा. आखतुली ता. खेड) ,रामदास होले(रा. कासारी ता. खेड), सुनील भालशिंग(रा. कोळीये ता. खेड), दत्तू शिवेकर(रा. शिवे ता. खेड), अरुण कुदळे(रा. देवतोरने ता. खेड), नवनाथ शिवेकर (रा. शिवे ता. खेड), तान्हाजी डांगले (रा. पराळे ता. खेड), गणेश जाधव (रा. गावरवाडी ता. खेड) आदी९ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस ठाण्याने दिली. चाकणचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश राठोड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDamधरणState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी