(स्टार १०६७ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील बाजारात कोरोनाकाळात कोणत्याही मसाल्याच्या दरात वाढ झाली नाही. रामपत्री, बदामफूल, वेलची, काळी मिरी, जिरे, नाकेश्वरी, लवंग, जायपत्री, तमालपत्री आदी मसाल्यांचा बाजारात मागणीप्रमाणे पुरवठा हाेत असल्याने याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दर वर्षी सणासुदीच्या काळात मसाल्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असते. मात्र, मागील वर्षभरात कोरोनाकाळातही मसाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. मुख्यत: बाजारातील मागणीच्या प्रमाणात विविध राज्यांतून पुण्यात मसाल्याचा चांगला पुरवठा झाला आहे. तसेच, व्यापाऱ्यांनीही महिना-दोन महिने पुरेल एवढा साठा करून ठेवला होता. त्यामुळे दर स्थिर राहिले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
------
* सहा महिन्यांपासून दर स्थिर (प्रति किलो)
मसाला सध्याचे दर
रामपत्री ७५०-८५०
बदामफूल ८५०-१२५०
वेलची १००-१७००
काळी वेलची ७००-९००
काळी मिरी ४५०-५००
जिरे १६०-१८५
नाकेश्वरी १४०० (स्थिर)
लवंग ५५०-७५०
जायपत्री २२५० (स्थिर)
तमालपत्री ६०
-----
दोन मसाल्यांचे वाढले दर
पुण्याच्या बाजारात मागणीप्रमाणे पुरवठा होत आहे. महिनाभर पुरेल एवढा साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे दरात कोणत्याही प्रकारे वाढ होण्याची शक्यता नाही. केवळ बदामफूल आणि लवंग या दोन मसाल्यांमध्ये १०० ते २०० रुपये अशी किरकोळ वाढ झाली आहे, असे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
---
सणासुदीच्या काळात ३० टक्के दर वाढणार?
आगामी सणासुदीच्या काळात मात्र मसाल्यांच्या दरात ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, दर वर्षी सणासुदीच्या काळात तेवढी वाढ होत असते. बाजारात या काळात मागणी एकदम वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठ्यावर थोड्या प्रमाणात फरक पडतो. त्याचा परिणाम म्हणून २० ते ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ होत असते.
- विनेश लाहोटी, किरकोळ विक्रेता