पुणे : शब्द जेव्हा भावनेच्या माध्यमातून प्रकट होतात, तेव्हा त्यांना साहित्यिक मूल्य प्राप्त होते. बुद्धी, मन आणि मनगट यांच्या समन्वयाने मिळणारे शिक्षण म्हणजे ज्ञान, असे मौलिक विचार विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांनी व्यक्त केले.कवयित्री शोभा पांडे यांच्या ‘तरंग मनाचे’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यात प्रा. डॉ. पुंड बोलत होते. गुरू गणेशनगर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे, पं. यादवराज फड, प्रकाशिका त्रिवेणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.कवयित्रीच्या जाणिवा यांना समाजाचे काही देणे असते. कविता व तिचा आशय हा समाजातील पारंपरिक जीवनमूल्यांचे पोषण करणारा असल्याचे जाणवते, असे मत डॉ. पुंड यांनी व्यक्त केले.‘वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्त्व, स्पर्श जैसा’ ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगून पं. फड यांनी कवितेच्या माध्यमातून रसिकांनी परतत्त्वाची ओळख करून दिली.श्रीपाद पांडे, मनीषा सुभेदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. मंजूषा बापट यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
भावनेतून प्रकट होणाऱ्या शब्दाला मूल्य
By admin | Published: March 29, 2017 2:43 AM