शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

काकडी, वांगी, भेंडी, दोडका, कारली, मटार, पावट्याचे भाव घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:07 AM

पुणे : मागणी घटल्याने काकडी, वांगी, भेंडी, दोडका, कारली, मटार आणि पावट्याचे भाव घटले. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव ...

पुणे : मागणी घटल्याने काकडी, वांगी, भेंडी, दोडका, कारली, मटार आणि पावट्याचे भाव घटले. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. मार्केट यार्डात रविवारी (दि. १८) फळभाज्या आणि भाजीपाल्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत सारखीच होती. साधारणत: ९० ते १०० गाड्यांची आवक झाली.

इतर राज्यांतून आलेला माल : गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, मध्य प्रदेश येथून ६ ते ७ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवीमिरची, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून मटार २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर आणि गुजरातमधून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक इतकी आवक झाली आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेला माल :

कोबी ४ ते ५ टेम्पो, प्लॉवर ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ९ ते १० टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, सातारी आले १७०० ते १८०० गोणी, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि साताऱ्याहून मटार ५ ते ६ टेम्पो, कांदा ४५ ते ५० ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १६०-२००, बटाटा : ९०-१४०, लसून : ४००-११००, भुईमुग शेंग : ३००-३५०, मटार : स्थानिक : ४५०-५००, परराज्य ४००, पावटा : २००-२५०, आले : सातारी १००-२००, भेंडी : १५०-२००, गवार : २५०-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : ३००-४००, ढोबळी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १००-१६०, चवळी : १००. १५०, काकडी : ८०-१२०, कारली हिरवी १५०-२००, पांढरी १४०-१५०, पापडी : १५०-२००, पडवळ : १५०-२००, प्लॉवर: ६०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, तोंडली : कळी २००-२५०, जाड, ९०-१००, शेवगा : ४००-४५०, गाजर २००-२५०, वालवर २००-२५०, बीट: ८०-१२०, घेवडा : ६००-७००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००- २५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २००-२२०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, नारळ : शेकडा १०००-१६००, मका कणीस : ६०-१००.