शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

फळभाज्यांची आवक घटून भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:09 AM

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटूनही कांद्याचे भाव ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटूनही कांद्याचे भाव स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची आवक आणि भावात घसरण झाली. भुईमूग शेंगाची काहीही आवक झाली नाही तर लसणाची आवक घटूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाली.वांगी,भेंडी,कारली,ढोबळी मिरची, गवार,दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक घटूनही बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची प्रचंड आवक झाली.जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय,म्हैसीच्या संख्येत घट झाली तर बकरी ईदमुळे बोकडांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल १ कोटी ९० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक एक हजार क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत दोन हजार क्विंटलने घटूनही भाव एक हजार ८०० रुपयांवर स्थिर राहिले.तळेगाव बटाट्याची एकूण १,२५० मागील आठवड्याच्या तुलनेत आवक ७५० क्विंटलने घटल्याने १०० रुपयांनी भावात घसरण झाली.

बटाट्याचा बाजारभाव १,४०० रुपयांवरून १,३०० रुपयांवर आले. लसणाची एकूण आवक १८ क्विंटल होऊनही लसणाला ९,००० रुपये बाजारभाव मिळाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २९२ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला १,५०० ते १ २,५०० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –

कांदा - एकूण आवक - १,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,८०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. ९०० रुपये.

फळभाज्या -

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -

टोमॅटो - १६० पेट्या ( ५०० ते १,००० रू. ). कोबी - २४७ पोती ( ४०० ते ८०० रू. ). फ्लॉवर - १५२ पोती ( ४०० ते ८०० रु.),वांगी - ५३ पोती ( १,००० ते २,००० रु.), भेंडी - ५४ पोती ( १,००० ते २,००० रु.),दोडका - ४६ पोती ( १,५०० ते २,५०० रु.), कारली - ५८ डाग ( १,००० ते २,००० रु.), दुधीभोपळा - ४४ पोती ( ६०० ते १,२०० रु.),काकडी - ५० पोती ( ५०० ते १,५०० रु.), फरशी - २१ पोती ( ३,००० ते ४,००० रु.), वालवड - २९ पोती ( २,००० ते ३,००० रु.), गवार - ६२ पोती ( २,००० ते ३,००० रू.), ढोबळी मिरची - ५७ डाग ( १,५०० ते २,५०० रु.), चवळी - १८ पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ). वाटाणा - ७० पोती ( ३,५०० ते ४,५०० रुपये ). शेवगा - १४ पोती ( ३,००० ते ४,००० रुपये ). गाजर - ४० पोती ( १,००० ते २,००० रु.).

पालेभाज्या –

राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ८५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०१ ते १२०१ रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ७० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २५१ ते १६५१ रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ४५१ रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -

मेथी - एकूण १९ लाख ६२५ हजार जुड्या (६०० ते १२०० रुपये ). कोथिंबीर - एकूण २६ हजार ५८० जुड्या (५०० ते १००० रुपये ). शेपू - एकूण ४ हजार २५० जुड्या (३०० ते ६०० रुपये ). पालक - एकूण २ हजार ७३० जुड्या (४०० ते ६०० रुपये ).

जनावरे -

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३० जर्शी गायींपैकी २२ गाईची विक्री झाली. ( १२,००० ते ६,५००० रुपये ), ५५ बैलांपैकी ३७ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,५००० रुपये ), ४७ म्हशींपैकी ३३ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ७,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४९५० शेळ्या - मेंढ्यापैकी ४५७० मेंढ्यांची विक्री झाली.(२,००० ते ४०,००० )

२५ चाकण

चाकण बाजारातील आडतदार संतोष खैरे यांच्या गाळ्यावर वांग्याची झालेली आवक.