पुणे : मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मागणी कमी असल्याने मुळे वगळता सर्वच पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात हरभऱ्याच्या जुडीची आवक सुरू झाली आहे. रविवारी सुमारे २० हजार जुडीची आवक झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
बाजारात रविवारी कोथिंबिरीची पाऊणे दोन लाख जुडी आवक झाली.तसेची मेथीची आवक वाढली असून रविवारी बाजारात सव्वा लाख जुडी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबीर, चाकवत, पुदीना, चवळईच्या भावात जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांची घट झाली तर मेथी, करडई, राजगिरा आणि पालकच्या भावात जुडीमागे एक रुपयांची घसरण झाली. तसेच अंबाडीच्या भावात जुडीमागे तीन रुपयांची घट झाली आहे. केवळ मुळेच्या भावात तीन रुपयांची वाढ झाली आहे.
---
पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००-४००, मेथी : १००-४००, शेपू : १००-३००, कांदापात : १२००-१५००, चाकवत : २००-३००, करडई : ५००-६०० , पुदिना : १००-२००, अंबाडी : २००-३००, मुळे : ८००-१३०० , राजगिरा : २००-४००, चुका : ४००-५०० , चवळई : ४०० - ५०० , पालक : २०० - ४०० , हरभरा गड्डी ८०० ते १२००.