शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

बटाट्याचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:27 AM

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाट्याची आवक घटल्याने भाव कडाडले. कांद्याची विक्रमी आवक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणत घट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाट्याची आवक घटल्याने भाव कडाडले. कांद्याची विक्रमी आवक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणत घट झाली. टोमॅटो व कोबीची विक्रमी वाढ झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक घटल्याने भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, बटाटा, फ्लॉवर यांची किरकोळ आवक झाली. हिरव्या मिरचीची आवक कमी होऊनही भावात घसरण झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथीसह कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची किरकोळ आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गायींसह बैल व म्हशींच्या संख्येत घट झाली. मात्र, शेळ्या-मेंढ्यांच्यासंख्येत मोठी वाढ झाल्याने भाव गडगडले. शेलपिंपळगाव येथील फळभाज्यांच्या उपबाजारात हिरवी मिरची व गवार वगळता फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीसह कोथिंबीर व शेपूची प्रचंड आवक झाली. पालक भाजीची आवक कमी होऊनही भावात घट झाली. शेलपिंपळगाव येथील पालेभाज्यांच्या उपबाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल १ कोटी ६० लाख रुपये झाली. चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ५५५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १७० क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भाव गडगडले. कांद्याचा कमाल भाव ८०० रुपयांवरून ७५० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार ७२० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटल्याने भाव कडाडले. बटाट्याचा कमाल भाव ७०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव ५ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २४५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५४ क्विंटलने घटूनही भावात घसरण झाली. हिरव्या मिरचीला ३,५०० ते ४,५०० रुपये असा कमाल भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव रुपयांत असेकांदा - एकूण आवक - ५५५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ७५०, भाव क्रमांक २ : ६५०, भाव क्रमांक ३ : ५००. बटाटा - एकूण आवक १७२० क्विंटल. भाव क्रमांक १ - १,०००, भाव क्रमांक २ - ७५०, भाव क्रमांक ३ - ५००. फळभाज्या टोमॅटो (एकूण ५१० पेट्या) ४,००० ते ६,०००, कोबी - (एकूण ३९६ पोती) ६०० ते ८००, फ्लॉवर - (एकूण २८० पोती) १,००० ते १,६००, वांगी - (एकूण ४९२ पोती) २,५०० ते ३,५००, भेंडी - (एकूण २८० पोती) २,५०० ते ३,५००, दोडका - एकूण - (२१९ पोती) ३,००० ते ४,०००, कारली - (एकूण ४१८ पोती) २,००० ते ३,०००, दुधी भोपळा - (एकूण १४२ पोती) ५०० ते १,५००, काकडी - (एकूण २८० पोती) १,००० ते २,०००, फरशी - (एकूण ८२ पोती) ३,००० ते ५,०००, वालवड - (एकूण ९५ पोती) ३,५०० ते ५,०००, गवार - (एकूण ११६ पोती) २,००० ते ३,०००, ढोबळी मिरची - (एकूण ४५० पोती) २,००० ते ३,०००, चवळी - (एकूण १३० पोती) १,००० ते २,०००, वाटाणा - (एकूण ५० पोती) ६,००० ते ८,०००, शेवगा - (एकूण ४५ पोती) ४,००० ते ६,०००.पालेभाज्यामेथी - एकूण ८ हजार ४७० जुड्या (२०० ते ६००), कोथिंबीर - एकूण १० हजार ४०२ जुड्या (२०० ते ५००), शेपू - एकूण २ हजार ३२५ जुड्या (४०० ते ८००), पालक - एकूण ३ हजार १३५ जुड्या (३०० ते ६००).जनावरे चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्शी गायींपैकी २० गायींची विक्री झाली. (२०,००० ते ४०,००० रुपये), ६० बैलांपैकी २५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३०,००० रुपये), ७० म्हशींपैकी ३२ म्हशींची विक्री झाली (२०,००० ते ६०,००० रुपये), ८,५५० शेळ्या - मेंढ्यांपैकी ७,६५० शेळ्यांची विक्री झाली. (२,००० ते १०,००० रुपये).