शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

ऊस बेण्याच्या किमती कडाडल्या

By admin | Published: May 12, 2017 4:52 AM

दौंड तालुक्यात अपुऱ्या ऊसपिकामुळे ऊस बेण्याचे दर चालू हंगामात कडाडले आहेत. प्रतिटन ४५00 इतका दर फुटल्याचे शेतकरीवर्गामधून सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराहू : दौंड तालुक्यात अपुऱ्या ऊसपिकामुळे ऊस बेण्याचे दर चालू हंगामात कडाडले आहेत. प्रतिटन ४५00 इतका दर फुटल्याचे शेतकरीवर्गामधून सांगितले जात आहे. राहूबेट परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेत असतो. त्यामुळेच तालुक्यात चार साखर कारखाने आणि ३00 हून अधिक गुऱ्हाळाची संख्या आहे. दरम्यान आगामी २०१७ ते २०१८ या वर्षाच्या ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीपूर्व तयारी पूर्ण केली आहे. शेतकरी रोहिणी नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिला पाऊस झाला की, राहूबेट परिसरातील शेतकरी गूळ उत्पादनासाठी आडसाली उसाच्या लागवडी सुरु करतात. ही गेल्या पन्नास वर्षांपासूनचे ऊस लागवडीचे नियोजन आजही सुरू आहे. सध्या कोईमतूर, २६५, ८६०३२ या जातीच्या उसाच्या बेण्याची निवड शेतकरी करीत आहेत.गेल्या हंगामात सन २०१६ ते २०१७ या हंगामात लागवड झालेल्या आडसाली उसापैकी बहुतेक ऊस हा गूळ उत्पादनासाठी आणि उर्वरित ऊस हा दौंड, बारामती, अहमदनगर यासह शेजारील तालुक्यातील रसवंती गृहांसाठी गेला आहे, तसेच जातही आहे. तसेच गेल्या हंगामातील लागवड झालेला ऊस या गुऱ्हाळ चालकांनी गाळप केला आहे. चालू वर्षी लवकरच विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने व महावितरणच्या वाढत्या भारनियमनामुळे उसाची पिके हातची गेली आहेत. त्यात दौंड तालुक्यातून जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस पुणे, अहमदनगर या ठिकाणी जातो. बहुतांशी ठिकाणी उसाची पिके जळून गेल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ऊसपीक कमी झाल्याने याचा परिणाम आगामी आडसाली ऊस लागवडीवर होणार आहे. त्यामुळे साहजिकच ऊस बेण्याचे दर कडाडले आहेत.