कलिंगड आणि पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी, तर चिक्कूच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी १० ते १२ टन, संत्री १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू २५० ते ३०० के्रट, चिक्कू शंभर बॉक्स खरबुजाची १ ते २ टेम्पो इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :- लिंबे (प्रति गोणी) : ६०-१५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ९०-३५०, (४ डझन) : ४० ते १२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१३००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-३०, आरक्ता ५-२०. कलिंगड: ८-१२, खरबूज : १५-२०, पपई : ८-१५, चिक्कू (१० किलो) २००-७००, पेरू (२० किलो) : १५०-३००.