द चॅम्पियन कराटे क्लास कोरेगाव भीमा येथे माहेर संस्थेच्या वतीने आशा वर्कर व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा कोविड योद्धा प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन, राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांचा सन्मान करून, माहेर संस्थेच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. कोरेगाव भीमातील आशा वर्कर तसेच अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या अमूल्य सेवेमुळे त्यांचा कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन समान केला. माहेर संस्थेने आमचा सन्मान केला याबाबत आभारी आहोत, अशा भावना आशा वर्कर सुवर्णा तापकीर, मंगल खरात, सोनाली राऊत यांनी मांडल्या. कार्यक्रमाचे नियोजन तेजस्विनी पवार यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम भुजबळ यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ज्ञानेश्वर गव्हाणे, प्रवीण उत्तम गव्हाणे, ईश्वर दरवडे, भुजबळ, वृषाली चव्हाण, मंगल खरात, कविता कदम, विजय व रमेश दुतोंडे तसेच आशा वर्कर व अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. तेजस्विनी पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गव्हाणे, प्रवीण गव्हाणे यांच्यासह इतर मान्यवर.