शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

लोकशाहीची शान, करा निर्भयपणे मतदान

By admin | Published: February 21, 2017 2:19 AM

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणानुसार विभागणी करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात

पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणानुसार विभागणी करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात ७५ गट आणि १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदारांनी प्रत्येक गणासाठी एक आणि गटासाठी १ अशी दोन मते द्यायची आहेत. मतदान करताना जर संबंधित गटांमध्ये उमेदवारांची संख्या १५ पेक्षा अधिक असेल तर अशा वेळी मतदानयंत्रांची संख्या वाढवण्यात येईल. त्यानुसार मतदारांनी दक्षतेने आपले योग्य ते मत द्यायचे आहे. मतदान करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. एखाद्या गटातील कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसल्यास त्या गटासाठी ‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) अधिकार वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा ते मत बाद होईल. मतदानयंत्रावर गट आणि गणामध्ये मत दिल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अफवांना आले उधाण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या अफवाही पसरविल्या जात आहेत. एका पक्षाला चार मते दिली तर आपले मत बाद होईल किंवा चारही गटात एकाच पक्षाला मतदान केले तर वैध ठरेल, अशा अफवा सर्रासपणे पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्हापरिषदेच्या ७५ गट आणि १५० गणांमध्ये मिळून जवळपास १००४ उमेदवार रिंगणात आहेत. त्या त्या गटातील उमेदवारांची माहिती घेऊन मतदारांनी त्यांचा कौल द्यायचा आहे. त्यांच्या मतातूनच जिल्हापरिषद व पंचायतसमितीच्या कारभाराची संधी कोणाच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळ जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाला जाताना अनेक प्रकारांनी दिशाभूल होऊ शकते मात्र मतदारराजाने त्याच्या मनातील निर्णयावर ठाम राहूनच कौल द्यायचा आहे. ग्राह्य धरणार १७ पुरावे कान्हुर मेसाई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर १७ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा घेऊन मतदारांनी मतदान केंद्रात जावे, असे आवाहन शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.मतदारांनी पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), आयकर विभागाकडील पॅन कार्ड, ओळखपत्र, केंद्रशासन/ राज्यशासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे (फोटो आयकार्ड), राष्ट्रीयीकृत बँक अथवा पोस्ट आॅफिस यामधील खातेदारांचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम अधिकाऱ्याने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासप्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादींना फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिटेकट फोटोसहित असलेले), राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे, तसेच नोंदणी खत इत्यादी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत फोटोसहित देण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा परवाना (वेपन लायसन्स), राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र आदी पुरावे ग्राह्य धरले जातील. या पैकी एक पुरावा सोबत ठेवावा, असे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.‘लोकमत’चे आवाहनमतदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील अमूल्य घटक आहे. यासाठी निर्भयतेने, कसल्याही आमिषाला बळी न पडता, कोणताही भेदाभेद मनात न ठेवता मतदान करावे. आचारसंहितेचे सर्व नियम व निकष तंतोतंत पाळून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा. महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत आहे. प्रत्येकाला चार मते द्यायचीच आहेत. एखाद्या गटात कोणताही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) मत द्यायचे आहे. चार मते दिल्याशिवाय मतदानप्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले अमूल्य मत बाद होणार नाही किंवा अवैध ठरणार नाही, याची प्रत्येक मतदाराने काळजी घ्यावी.खोटेएकच चिन्हासमोर चार वेळा बटण दाबायचे.बोटावरची शाई निघत नाही.एकाच पक्षाला मत दिले तर बाद होणार.नोटा पर्याय वापरायचा नाहीखरेचुकीचे आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करता येईल.काही दिवसांनंतर निघतेचुकीचे आहे. वेगवेगळ्या पक्षाला दिले तरी चालेल पण चार वेळा दिले पाहिजे.वापरलाच पाहिजे असे बंधनही नाही, मतदाराच्या इच्छेवर अवलंबून आहे.