पुणे : गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय, वरिष्ठ वेतनश्रेणी अशी थकलेली बीलं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ३३ कोटी अनुदान प्राप्त झाल असून यातून ही बिले दिली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.दोन वर्षांपासून शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित होती. निधी उपलब्ध व्हावा, याकरिता शिक्षण विभागामार्फत राज्यस्तरावर सतत पाठपुरावा सुरू होता.याल यश आले असून शिक्षण विभाग (प्राथमिक) करिता रक्कम रु. ३३ कोटी अनुदान प्राप्त झालेले आहे. यातून बिलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित बिले मिळणार
By admin | Published: April 02, 2016 3:27 AM