पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी 'खोटं बोल पण रेटून बोल' हे थांबवावं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:48 PM2021-04-30T20:48:15+5:302021-04-30T20:48:55+5:30

नाना पटोले यांनी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलला भेट देत खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची केली विचारपूस

Prime Minister Modi and Fadnavis should stop saying lie by forced ; Nana Patole's attack | पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी 'खोटं बोल पण रेटून बोल' हे थांबवावं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी 'खोटं बोल पण रेटून बोल' हे थांबवावं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next

पुणे: राज्यासह देशभरात कोरोना संकटाने हाहाःकार उडविला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.मात्र, याचवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोरोना काळातील वैद्यकीय मदतीवरून होत असलेल्या आरोप- प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवितानाच पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुणे येथील जहांगीर रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करत व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांसंबंधी माहिती घेतली.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसी, ऑक्सिजन, रेमडिसिविर, व्हेंटिलेटर असे सर्व उपचार साहित्य केंद्र सरकारकडे आहे. मात्र याचा सुरळीत पुरवठा राज्यांना होत नाही.केंद्र सरकारने राज्यांवर अन्याय केला आहे. 

पुढे ते म्हणाले, जागतिक पातळीवर मदत सुरू झाली आहे. अनेक देश राज्याला मदतीसाठी पुढे आले आहेत. मात्र आता कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात यावे अशीही मागणी पटोले यांनी यावेळी केली.

कोरोना काळातील रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या परिस्थितीत ज्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येत कोविड सेंटर सुरू केले त्यांचं अभिनंदन देखील पटोले यांनी यावेळी बोलताना केले. 

पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर  निशाणा...

पंतप्रधान नरेंद मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, कोरोनाची भीषण परिस्थितीत  पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी आतातरी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं थांबवायला हवे.

Web Title: Prime Minister Modi and Fadnavis should stop saying lie by forced ; Nana Patole's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.