पंतप्रधानांनी फक्त गुजरात लाच मदत जाहीर केली असून महाराष्ट्राचा दौरा रद्द केला असा दावा उपुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. गुजरात चा मदतीचा प्रस्ताव नसतानाही मदत केली गेली असं पवार म्हणाले. पुण्यामध्ये आज अजित पवार यांचा उपस्थिती मध्ये कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
काही वेळापूर्वी पुण्यात बोलताना भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी सर्व राज्यांना मदत केल्याचा दावा केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा असं म्हणत टोला देखील लगावला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले "वादळ होतं त्यावेळी मी नियंत्रण कक्षात बसून होतो. नुकसान झालंय,काय याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात होतो. पालकमंत्र्यानी तिथं दौरे केले. तुलनात्मक या वादळाची तीव्रता कमी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता, पण तो दौरा रद्द झाला .नंतर ते डायरेक्ट गुजरात ला गेले देशात महाराष्ट्र पण राज्य आहे, जसं गुजरात राज्य आहे.इथं आले असते ,मदतीचा आकडा जाहीर झाला असता तर बरं वाटलं असतं ,योग्य झालं असतं
इतर राज्यात पण दौरा झाला असतं तर बरं झालं असतं .तिथं प्रस्ताव नसतांना त्यांनी हजार कोटींची मदत जाहीर केली"
दरम्यान नितीन राऊत यांचा जीआर बाबतचा वादाचा बाबत विचारल्यावर पवार चिडले. ते म्हणाले "नितीन राऊत यांच्या बद्दल मला माहिती नाही .जी आर बाबत मला माहिती नाही. त्यांनी काय सांगितलं हे मला माहिती नाही "
पदोन्नती बाबत बोलताना पवार म्हणाले "हायकोर्टाने सांगितल्यावर ती बाब ऐकावी लागते.अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ. महाविकासआघाडी सरकार ची पण भूमिका आहे.सरकार दुर्लक्ष करतंय अशी बाब जाऊ नये यासाठी काळजी घेऊ. त्यांचं वेगळं मत असेल तर कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पुढील बेंचच्या पुढे जातंय"
संभाजी राजे यांनी सारथी बाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले "प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. संस्थेला जागा नव्हती ती घेतली, आता मदत होतेय. जलसंपदा विभागाची जागा पण देत आहे .माझी आणि त्यांची भेट झाली तर मी त्यांना माझ्यावर जबाबदारी आल्यावर मी काय काय केलं हे सांगेन."
दरम्यान दहावी परीक्षा बाबत कोर्टाचा ताशेर्यांवर विचारलं असता अजित पवार म्हणाले "कंटेंम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही याची काळजी घेतली जाईल.मुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. 10 वीच्या परीक्षाबाबत कोर्ट काय म्हटलं हे बघावं लागेल.शिक्षण विभागाशी चर्चा करावी लागेल ,कोर्टाचा अवमान होणार नाही हे बघावं लागेल"
पुण्यात निघालेल्या गुंड अंत्यसंस्कार रॅली बाबत बोलताना ते म्हणाले
"ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालं तिथं पोलिसांवर पण कारवाई झाली. स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाहीतर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईला माघे पुढे बघितले जाणार नाही.मोटर सायकल चे नंबर बघून त्यांच्यावर कारवाई देखील कारवाई केली",