'पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक...' काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फ्लेक्सबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:17 PM2023-07-31T14:17:06+5:302023-07-31T14:19:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत....

'Prime Minister Narendra Modi Go Back...' Youth Congress flexes against Prime Minister Narendra Modi | 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक...' काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फ्लेक्सबाजी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक...' काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फ्लेक्सबाजी

googlenewsNext

चंदननगर (पुणे) : मणिपूर राज्य हिंसाचारात जळत आहे. यामध्ये दोनशेहून अधिक नागरिकांचे जीव गेले आहेत. सात हजारांहून जास्त लोक जखमी आहेत. साठ हजार नागरिक विस्थापित आहेत. महिला मुलींवर बलात्कार, खूण होतं आहेत. तीन महिने हा आगडोंब शांत करण्यात मणिपूर आणि केंद्रातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना यश आलेलं नाही. या मुद्यावरून पंतप्रधान संसदेपासून पळ काढत आहेत. संसदेत काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरं नं देता, मणिपूरमध्ये न जाता पंतप्रधान मोदी जगभर फिरत आहेत, असा आरोप पुण्यातील युवक काँग्रेसकडून करण्यात आला. त्याविरोधात शहरात काँग्रेसकडून फ्लेक्सबाजीही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला.

पुढे बोलताना युवक काँग्रेसमधील पदाधिकारी म्हणाले, पंतप्रधान पुण्यात येऊन पुरस्कार स्वीकारून, स्वतःचाच प्रचार करत आहेत. हे असंवेदनचे लक्षण आहे. या विरोधात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जनतेमध्ये तीव्र संताप आहे. काँग्रेससह अनेक पक्ष, संघटना, व्यक्ती, विचारवंत रस्त्यावर उतरुन मोदीजींच्या दौऱ्याला विरोध करणारं आहेत. आम्ही युवक काँग्रेस म्हणून ही लोकशाही मार्गाने जोरदार आंदोलन करणार आहोत. मोदीजींच्या असंवेदनशिलतेचा चेहरा उघडा पाडण्यासाठी, बेरोजगारी, महागाई, हिंसाचार यावर मोदीजींना जाब विचारण्यासाठी आम्ही आमच्या संतप्त भावना यां फेक्सद्वारे व्यक्त करत आहोत.

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात आम्ही "पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक" आणि इतर मजकूर असलेले फ्लेक्स लावले असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट यांनी दिली.

Web Title: 'Prime Minister Narendra Modi Go Back...' Youth Congress flexes against Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.