पुणे : रशिया- युक्रेन युध्दामुळे जागतिक पातळीवर ६० ते ७० देशाची अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पायाभूत सोईसुविधांचा विस्तार केला जात आहे. पुर्वी काँग्रेस सरकारने भ्रष्टाचार करून देशाची अर्थव्यवस्था कमजोर केली होती. १० वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आली होती. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाची अर्थव्यवथा प्रगती पथावर घेऊ जात आहेत. त्यामुळेच भारत सध्या जगात पाचव्या क्रमांकाचा देश बनला आहे. २०२४ मध्ये मोदीना सत्ता दिली तर भारताची अर्थव्यवस्था ३५ मिलीयन डॉलरची होईल अन् ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केला.
दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व.उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा "आदर्श व्यापारी "उत्तम" पुरस्कार'' प्रदान सोहळा शनिवारी सेनापती बापट रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे पार पडला. यावेळी पीयुष गोयल बोलत होते. यावेळी राज्यस्तरावरील पुरस्कार मे. दांडेकर आणि कंपनीचे अरुण दांडेकर, पुणे जिल्हा स्तरावरील पुरस्कार कल्याण भेळचे रमेश कोंढरे, पुणे शहर स्तरावरील पुरस्कार पुरुषोतम लोहिया यांना देण्यात आला. तर दि पूना मर्चंटस् चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांना देण्यात आला. युवा व्यापारी पुरस्कार शुभम गोयल यांना तर कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा "आदर्श पत्रकार पुरस्कार'' पत्रकार प्रविण डोके यांना देण्यात आला.
यावेळी जेष्ठ विधी सल्लागार अॅड. एस. के. जैन, लायन्सल क्लब इंटरनशनल झोन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, कामगार कष्टकरी नेते बाबा आढाव, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार,चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, उपाध्यक्ष अजित बोरा, वालचंद संचेती, आशिष दुगड, दिनेश मेहता, नवीन गोयल, ललित जैन इ. उपस्थिती होते.
यापुढे गोयल म्हणाले, २०१४ पूर्वी व्यापाऱ्यांना, उद्योगांना पोशाक वातावरण नव्हते. कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करणे, पायाभूत सुविधामध्ये रस्ते, मेट्रो आणि विमानतळांची संख्या वाढ करणे यामुळे विकासाला चालना मिळाली आहे. देशाचा जीडीपी रेट वाढवला असून जगाच्या पाठिंवर सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. व्यापा-यांना व्यवसायांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, त्या प्रमाणे पुणेकर व्यापार उद्योगातही पुढे आहेत. जगात विविध क्षेत्रात आपला ठसा उमतावता पुणेकरांनी देशाची मान उंचावली आहे.
यावेळी याकार्यक्रमाच्या प्रास्ताविक राजेंद्र बाठिया यांनी केले . यावेळी बाठिया यांनी ऑनलाइन शॉपिंगमुळे व्यापाऱ्यांपूढे पेच निर्माण झाल्याने अनेक व्यापा-यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सरकारने केद्राकडून व्यापाऱ्यांसाठी पुरस्कार सुरू करून ज्येष्ठ व्यापाऱ्यांना पेन्शन सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निकिता बाठीया यांचा मिलेट मधील योगदानाबद्दल गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उत्तम बाठीया यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन द्वारका जालान यांनी केले.