पुणे: गेल्या आठवड्याभरापासून रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मोदी यांनी शौरींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी आणि शौरी यांना संवाद साधण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एकांत दिला होता. मोदी आणि शौरी यांची अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे.दोघे आठवणीमध्ये रमले होते. एकमेकांशी बोलताना दोघेही एकेरी उल्लेख करताना दिसत होते. जवळपास पंधरा मिनिटे दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. रुग्णालयातून निघताना 'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना ते थोडे भावनाविवश झाले होते, असे रुग्णालयाचे न्यूरॉसर्जन डॉ सचिन गांधी यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:16 IST