शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पुणे दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी 'एसपीजी'वर; 'या' विशेष विमानाने होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 9:58 AM

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला ते भेट देणार असून कोरोना विषाणूवरील लसीची ते माहिती घेणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलिसांसह विशेष सुरक्षा दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली असून त्यांचे नामकरण 'एअर इंडिया वन'असे करण्यात आले आहे. या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत १०० देशांचे राजदूत असल्याने या दौऱ्याला मोठे महत्व आहे. दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळ येथे येणार असून त्यानंतर ते हेलिकॅाप्टरने 'सिरम'मध्ये जाणार आहे. या  काळात पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा बलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील मोठ्या पदावरील महत्वांच्या व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा दलांची आवश्यकता जाणवू लागली. त्यानंतर या बलाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९८५ ला केंद्रीय गृह मंत्रालयाने या साठी बिरबलनाथ समितीची स्स्थापना केली. या समितीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. ३० माचर्च १९८५ ला राष्ट्रपतींनी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता देत या साठी ८१९ पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली. त्यानंतर २ जुन १९८८ ला भारतीय संसदेच्या एका अधिनिय मानुसार स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुपची (एसपीजी) स्थापना झाली.

 कुठल्याही प्रकारच्या हल्यापासून पंतप्रधानांची सुरक्षा करण्यास सक्षम-

'एसपीजी'मध्ये असलेले स्पेशल कमांडो हे पंतप्रधानांचे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम असतात. त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. सर्व प्रकारची आधुनिक हत्यारे, आधुनिक गाड्यांचा ताफा या बलांकडे असतो. आण्विक हल्ल्यापासूनही बचावासाठीही या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.  डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधिकारी या दलाचा प्रमुख असतो. त्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवास स्स्थानात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रवासाठी आता एअर इंडिया वन-

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या देशातील तसेच परदेशाच्या प्रवासाठी बोईंग ७७७ ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अमेरीकेत राष्ट्रपतीच्या प्रवासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा या विमानात आहे. त्याच धरतीवर एअर इंडीया वन या विमानात सुरक्षा यंत्रणा आहे. जवळपास ८ हजार ४०० करोड रूपये किमंतीची ही विमाने आहेत. या विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसIndiaभारत