पंतप्रधान मोदींनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:58 PM2022-02-28T18:58:10+5:302022-02-28T19:00:52+5:30
अजित पवारांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
पुणे: राज्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची (narendra modi) स्तुती केली आहे. शनिवारी आढावा बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे अजित पवारांनी कौतुक केलं आहे. मोदींचे कौतुक करताना, जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता मत देते, असं पवार म्हणाले.
'पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्ये मुद्दे--
-पुणे जिल्ह्यात ५१ टक्के कोरोना घट
- पुण्याचा कोरोना दर ४.४ टक्के झाला आहे.
- पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू होणार, सर्व नियमाचा पालन करून शाळा सुरू होणार. पालकांना वाटलं तर त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत.
- लसीकरण जास्तीत जास्त करणं सुरू आहे
- १ मार्चपासून जम्बो हॉस्पिटल बंद होणार. पुणे महापौर यांच्याशी बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी बोलून अन रुग्ण संख्या पाहता आता गरज वाटत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विभागीय आयुक्तांनी सागितले की पंतप्रधान मोदी याचा दौरा आहे. मी पालकमंत्री म्हणून असेल मुख्यमंत्री त्यांच्या तब्येतमुळे तेच निर्णय घेतील.
- राज्यातील कोरोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.सध्या कोरोना आकडेवारी घट होत आहे.