पुणे : पाच वर्षात भाजपने सर्व सत्ता केंद्र काबीज केली आहेत.सध्या पंतप्रधानपदाची जागाच रिकामी नसल्यामुळे विरोधक एकत्र येऊन काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. पुण्यात आयोजित शक्ती केंद्र प्रमुखांच्या संमलेनात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिवीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, २०१४ पेक्षा जास्त कष्ट करून २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्ही मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावर मागच्यावेळी जिंकलेल्या ४२ जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू. देशातील गरीबांसाठी मोदींनी गेली पाच वर्षात काम केले आहे. कॉग्रेसचे सरकार शेतकरी विरोधी होते. भाजपवर राज्यघटना बदलत असल्याचा आरोपावरही त्यांनी विरोधकांनी टीका केली. ते म्हणाले की, विकासाकडील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आम्ही राज्यघटना बदलणार असल्याचे सांगितले जाते.काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रेम येत आहे. त्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखताना आणि त्यांचा निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव करताना हे प्रेम कोठे गेले होते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.