मुंबई/पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. (PM Narendra Modi a Visit of Maharashtra) देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत. नरेंद्र मोदींचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगामुळे गोंधळ; देवस्थानाने अभंगात केला बदल
सदर कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी मुंबईसाठी रवाना होतील. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, लता मंगेशकर फाऊंडेशनचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आता होता. तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. त्याउलट मुख्यमंत्री एका आजीबाईंची भेट घेण्यासाठी गेले होते, ज्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलनाला आल्या होत्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा असल्याची चर्चाही रंगली होती.
सदर कार्यक्रमासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले होते, मात्र निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. सीएमओला हे प्रोटोकॉलच्या विरोधात वाटले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर ठळकपणे व्हायला हवा होता, परंतु तो करण्यात आला नव्हता.