लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. संसदेतील अधिवेशनातील उपस्थिती, चर्चासत्रातील सहभाग आणि उपस्थित केलेल्या प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खासदार डॉ.कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळणार आहे.
चालू सतराव्या लोकसभेत खा.डॉ.कोल्हे यांनी लोकसभेच्या सभागृहातील १४ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी आतापर्यंत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसह लोकोपयोगी विषयांवर एकूण २७७ प्रश्न उपस्थित केले. अल्पावधीतच खा.कोल्हे यांनी संसदेत उल्लेखनीय कामगिरी केली असून, प्रभावी भाषणांद्वारे छाप पाडत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे