पुणे : वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रिन्सीपलने महिला कॉऊन्सरलच्या मदतीने १४ वर्षीय विद्यार्थ्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात प्रिन्सिपल आणि महिला काँऊन्सिलरविरूध्द पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विन्सेंट परेरा आणि महिला कॉऊन्सरल जॅकलिन वॉस अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विद्यार्थ्याच्या पालकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा १० ते १२ मार्च २०१८ च्या दरम्यान प्रिन्सिपलच्या कार्यालयात आणि रेस्टरूममध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा १४ वर्षाचा मुलगा आरोपीच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी विन्सेंट परेराने पिडीत मुलाला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी वेळावेळी अश्लिल चाळे केले. ही घटना महिला कॉऊन्सलर जॅकलिन वॉस यांना माहित होती. तरीदेखील तिने या घटनेबाबत शाळेतील वरिष्ठांना सांगितले नाही. एवढेच नव्हे तर तिने पिडीत विद्यार्थ्याला दम दिला आणि ही घटना दडपुन ठेवली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी सांगितले की, या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली़. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबाशी संपर्क साधला़ त्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास चालू असून आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल. शाळेतील प्रिन्सिपल आणि महिला काँऊन्सिलरनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.