शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफित दाखविणाऱ्या प्राचार्याला धर्मगुरूंनी सुनावली होती पाच वर्षे नजरकैद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 8:22 PM

विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफीत दाखवल्या प्रकरणी वानवडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देशाळेतील महिला समुपदेशक जॅकलिन वॉस हिच्यावर गुन्हा दाखलन्यायालयाने प्राचार्याला सुनावली २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी एका प्रकरणात सोलापूर येथील हायस्कूलचे बिशप यांच्यामार्फत चौकशी

पुणे : विद्यार्थ्याला अश्लील चित्रफीत दाखवल्या प्रकरणी वानवडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्याला वानवडी पोलिसांनीअटक केली आहे. तपासादरम्यान प्राचार्यांने आणखी काही मुलांना अशी चित्रफीत दाखवली असल्याची बाब समोर आली आहे. परेराला त्यांचे पोलंड येथील धर्मगुरू यांनी पाच वर्ष नजर कैदेची शिक्षा सुनावली होती. एका प्रकरणात सोलापूर येथील हायस्कूलचे बिशप यांच्यामार्फत चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्याला नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा त्यांचे पोलंड येथील धर्मगुरू यांनी सुनावली होती. त्यानुसार त्याला वाघोली येथे ठेवले होते, असा धक्कादायक प्रकाण उघडकीस आला आहे. याप्रकरणी विन्सेंट व्हिजीटेवास संतानी परेरा (वय ५१, रा. वानवडी, मुळ रा. सांताक्रझ, मुंबई) असे कोठडी देण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. तर शाळेतील महिला समुपदेशक जॅकलिन वॉस हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पालकाने वानवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. परेरा याने पीडित विद्यार्थ्याला केबीनमध्ये बोलावून त्या आपल्या मोबाइलमध्ये अश्लील चित्रफित दाखवत असे आणि त्याच्याशी अश्लील चाळेही करीत. मार्च महिन्यात हा प्रकार त्याने केला होता. पीडित मुलाने हा प्रकार शाळेच्या महिला समुपदेशकाला सांगितले होते. तीने कुठलीही कृती न करता उलट या विद्यार्थ्यालाच गप्प बसायला सांगितले. या प्रकाराबद्दल शाळेकडून कुठलीही कारवाई होत नाही, असे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येताच त्याने याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. मात्र अनेकांकडून आलेला दबाव आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असल्याने पालकांनी आत्तापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नव्हती. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी पालकांना धीर दिला आणि तक्रार करण्यासाठी हिंमत दिली. त्यानंतर त्या पालकांनी प्राचार्य परेरा आणि महिला समुपदेशकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान फरेरा याला अटक करण्यात आली असून त्यांने आणखी काही विद्यार्थ्यांबरोबर हा प्रकार केला असून पोलीस त्याची माहिती घेत आहे.परेरा याला आणखी कोणी मदत केली आहे का?, फरार महिला समुपदेशकाचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी फरेराला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. मकरंद औरंगाबादकर यांनी केली होती. ती मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. म्हस्के करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळArrestअटकCourtन्यायालय