देऊळगावराजे : हिंगणीबेर्डी (ता. दौंड) येथील नदीपात्रातील बेसुमार वाळूउपशावर महसूल व पोलीस खात्याचा वतीने छापा टाकण्यात आला. या पथकाला पाहून वाळूचोर पळून गेले मात्र उत्खनन करणारे चार जेसीबी पकडण्यात आले. दरम्यान, वाळूमाफियाच्या सांगण्यावरून चालकाने ट्रॅक्टर पोलीस हवालदाराच्या आंगावर घातला. त्यांनी उडी मारल्याने ते वाचले.राजरोस नदीपात्रामध्ये अनधिकृतपणे जेसीबीच्या साह्याने वाळूउपसा सुरू होता. तहसीलदार उत्तम दिघे यांनी महसूल पथक तयार करून हिंगणीबेर्डी येथे छापा टाकण्यासाठी पाठविले. त्यावेळे जेसीबीच्या साह्याने ८ ट्रॅक्टर वाळू चाळून भरत होते. पथकाला पाहून वाळूचोर पळून गेले. उत्खनन करणारे चार जेसीबी पकडण्यात आले. ते तहसील कचेरीमध्ये आणण्यात आले आहेत. परंतु, वाळूवाहतूक करणारे ८ ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले. तलाठी माणिक प्रभू बारवकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून डॉ. रामभाऊ सूर्यवंशी (रा. मलठण), सुनील ढवळे (रा. ज्योतिबानगर), राजू पाहणे (रा. काळेवाडी), संतोष भोसले (रा. काळेवाडी), गौतम काळे (रा. काळेवाडी), गणेश बाळासाहेब भोसले (रा. ज्योतिबानगर) राजू पासलकर (रा. ज्योतिबानगर), किरण चव्हाण (रा. मलठण), अभिजित कतोरे (रा. ज्योतिबानगर), दीपक हडगळे (रा. देऊळगावराजे), नीलेश शंकर गाडे (रा. गाडेवाडी) या १४ जणांवर वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, पपू खताळ (रा. गिरीम), संतोष शिंगटे (रा. शिंगटेमळा), दादा खोमणे (रा. हिंगणीबेर्डी) यांच्यावर वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण हे गुन्हे दाखल केले आहेत.(वार्ताहर)वाळूचारांचा मुजोरपणाजप्त केलेल्या साहित्याजवळ तलाठी बारवकवर व पोलीस हवालदार राऊत उभे असताना पप्पू खताळ व त्याचा चालक मोटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी त्यांच्या ताब्यातील दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर परत घेतले. खताळ याने चालकाला, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घाल, बघतो काय करायचे ते, असे सांगितले़ चालकाने ट्रॅक्टर हवालदार राऊत यांच्या अंगावर आणला. तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधानाने त्यांनी बाजूला उडी मारली म्हणून त्याच्या उजव्या हाताला ट्रक्टर घासून गेल्याने खरचटले.
बेकायदेशीर वाळूउपशावर छापा
By admin | Published: May 03, 2016 3:23 AM