मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यावर पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी छापा मारून 64 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बेलदत्तवाडी येथे करण्यात आली. चांडोली बुद्रुक येथील बेलदत्तवाडी येथे रामदास शंकर थोरात यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली सात ते आठ इसम तीन पत्त्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळाली. कोरे यांच्यासह पोलीस पथकाने त्याठिकाणी जाऊन छापा मारला असता पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण हातातील पत्ते टाकून पळू लागले. त्यातील एका इसमास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याने रविराज विलास भोर (वय 32 रा.खडकी ता.आंबेगाव) असे नाव सांगितले. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार सुनील बाळू चव्हाण, परेश बबन थोरात, सुरेश पांडुरंग थोरात,अक्षय पोपट थोरात (सर्व रा.चांडोली बुद्रुक ता.आंबेगाव) शेखर शिंदे (रा.चांडोली खुर्द), आशिष शिवाजी एरंडे (रा.कोल्हारवाडी ता. आंबेगाव) अशी इतर पळून गेलेल्या ची नावे आहेत. रविराज भोर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 64 हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल मंचर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस जवान राजेंद्र नलावडे यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक विलास साबळे पुढील तपास करत आहे.
चांडोली बुद्रुक येथे तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:10 AM