भोर : म्हसरबुद्रुक (ता. भोर) येथील डोंगरात हातभट्टी तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून दारू बनविण्याचा माल व रसायन असा १२ हजार ५०० रुपयांचा जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोंडीबा नामदेव म्हसुरकर, धोंडीबा भांबू शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. म्हसरबुद्रुकपासून साडेपाच ते सहा किमी अंतरावर डोंगरात झाडाझुडपात बिगरपरवाना गावठी हातभट्टीची दारू आरोपी तयार करत होते. पोलिसांनी छापा टाकत दोघांना रंगेहाथ अटक केली. ही करवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी, धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस हवालदार उध्दव गायकवाड,अनिल हिप्परकर व होमगार्ड पथक यांनी केली आहे.
फोटो : म्हसरबु ता.भोर येथे हातभट्टीवर टाकलेला छापा