पिंपरी : काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या नातेवाइकांकडून आणि एका नगरसेवकाकडून शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून, २७ जुलै ला वायसीएममधील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ५ आॅगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मान्यतेसाठीे ठेवण्यात येणार आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यास ही सुरक्षा देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. सहा लाख रूपयांच्या हा प्रस्ताव आहे. एका पाळीत १ महिला सुरक्षा रक्षक, व ३ पुरूष सुरक्षा रक्षक असणार आहेत. असे तिन्ही पाळीत एकुण बारा सुरक्षा रक्षक असणार आहेत. पुढील दोन महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपात सुरक्षा रक्षक घेण्यात येणार आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला २५००० रूपये मानधन देण्यात येणार आहे. वायससीएम रूग्णालय हे कोरोनाच्या रूग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे. रोजच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. पुन्हा डॉक्टरांना धक्काबुक्की,शिवीगाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही सुरक्षा देण्यात येणार आहे. धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर डॉक्टरांनी आंदोलन केले होते. महानगरपालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,महापौर यांच्यात चर्चा झाली होती. तेव्हा सुरक्षित वातावरणाची हमी डॉक्टर अणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. शिविगाळ अणि दमदाटीच्या प्रकारामुळे डॉक्टर आणि रूग्णालयातील कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण होते.
पिंपरीतल्या 'वायसीएम' मध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता खासगी 'बाऊन्सर्स'?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 7:09 PM
डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ व दमदाटीच्या वारंवार घटना
ठळक मुद्देखासगी सुरक्षा सरक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ५ आॅगस्टच्या सभेत मान्यतेसाठी