शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

खाजगी रुग्णालयाने बिलासाठी मृतदेह पाच तास अडवून ठेवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:10 AM

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील एका खाजगी रुग्णालयाच्या प्रशासनाने बिलासाठी एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित मृताचा मृतदेह ...

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील एका खाजगी रुग्णालयाच्या प्रशासनाने बिलासाठी एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित मृताचा मृतदेह तब्बल पाच तासांहून अधिक काळ अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका राजकीय नेत्याच्या हमीनंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला असला, तरी यानिमित्ताने पूर्व हवेलीमधील खाजगी रुग्णालयांची मनमानी व अडवणूक यानिमित्ताने पुढे आली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या एका छोट्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे ५५ वर्षीय वडील कोरोनाबाधित झाल्याने, मागील पंधरा दिवसांपासून उरुळी कांचनमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालय प्रशासनाने या पंधरा दिवसांच्या काळात संबंधित रुग्णांच्या नातेवाईकाकडून पाच लाख रुपये अनामत रक्कम भरुन घेतली होती. मात्र, वरील रुग्ण गुरुवारी (दि. १५) सायकांळी पाच वाजण्याच्या सुमारास दगावला. या वेळी रुग्णालय प्रशासनाने संबधित रुग्णाचे पंधरा दिवसांचे सहा लाख वीस हजार रुपयांचे बिल मृताच्या नातेवाईकांच्या हातावर ठेवले.

दरम्यान, सहा लाख वीस हजारपैकी मृतांच्या नातेवाईकांनी पाच लाख रुपये अगोदरच भरले होते. मात्र मृताच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे बिलात सवलत देण्याची मागणी केली. मात्र बिलात सवलत देण्यास रुग्णालयाने ठाम नकार देत संपूर्ण बिल भरल्याशि्वाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे नातेवाईकांना सांगितले. यावर मृताच्या मुलाने बिल भरण्यास थोडीफार मुदत देण्याची मागणी केली. या मागणीसपण रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. अखेर सहा तासांनंतर एका सहकारातील ज्येष्ठ राजकीय नेत्याने उर्वरित बिल भरण्याची हमी घेतल्यावर, रुग्णालय प्रशासनाने मृत व्यक्तीचा मृतदेह संबंधित व्यक्तीच्या मुलाच्या ताब्यात दिला. मृतांच्या नातेवाईकांनी पैशासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप खाजगी रुग्णालय प्रशासनावर केला असला तरी, रुग्णालय प्रशासनाने मात्र वरील आरोप फेटाळून लावला आहे.

खाजगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी...

पूर्व हवेलीमधील अनेक खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करत असल्याचा तक्रारी आरोग्य विभागाकडे येऊ लागल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांकडून पूर्व हवेलीमधील अनेक खाजगी रुग्णालये पन्नास हजार ते सहा लाखांपर्यंत बिल आकारत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. मोठ्या रुग्णालयाच्या तुलनेत सुविधा कमी असतांनाही, छोट्या रुग्णालयात बिल मात्र अव्वाच्या सव्वा येत असल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे याही वेळी खाजगी रुग्णालयांच्या सरसकट बिलांचे ऑडिट करण्याची मागणी जिल्हा कांचन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाकडे केली आहे. याबाबत बोलतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले की बिलाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने बिलांचे ऑडिट करणार असून हवेली तालुक्यातील अनेक खाजगी रुग्णालये बिल आकारणी जादा दराने व चुकीची पध्दत वापरुन करीत असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. पन्नास हजारापासून कित्येक लाखात बिले येत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. खाजगी रुग्णालयांनी शासकीय दरानुसारच बिल आकारणी करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. ऑडिटमध्ये बिल चुकीचे आढळल्यास, रुग्णांच्या नातेवाईकांना बिलातील फरक परत देण्याबरोबरच, रुग्णालयाची नोंदणी रद्द कऱण्याची कारवाई ही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.