भिगवण : कोरोनाच्या भीतीमुळे छातीत आणि पोटात दुखत असल्याचे लक्षण असलेल्या रुग्णाला भिगवण आणि बारामती येथील खासगी दवाखान्यात वैदकीय सेवानाकारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी(दि. २२) रात्री घडली आहे. सेवा नाकारल्यामुळे अखेर त्या रुग्णाला जीव गमवावा लागला. विष्णू नामदेव काळंगे (वय ५२,रा.तक्रारवाडी) असे जीव गमावलेल्या रुग्णाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू काळंगे यांना १५ दिवसापूर्वी न्यूमोनिया आजाराचा त्रास झाला होता.यावेळी भिगवण येथील खासगी दवाखान्यात होता. यावेळी भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये निमोनिया आजारावर उपचार करण्यात आले होते.तसेच त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती.यावेळी तपासणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.पुढील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना आठ दिवसापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. या आठ दिवसात त्यांना कोणतीही आरोग्याची समस्या जाणवली नाही. मंगळवारी(दि २२) रात्री जेवण झाल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पोटात आणि छातीत दुखण्याची समस्या जाणवल्याने त्यांना नातेवाईकांनी भिगवण येथील खासगी आयसीयु सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी या खासगी हॉस्पिटलमधीलडॉक्टरला काळंगे यांची पाठीमागील हिस्ट्रीसह त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती असताना देखील त्यांना वैदकीय सेवा देण्यात आली नाही. उलट पुढील उपचारासाठी पुणे येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ,त्यांची प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना बारामती येथील नामांकित खासगी रुग्णालयात नेले. या ठिकाणी देखील त्यांना आवश्यक वैदकीय सेवा पुरविण्यात आली नाही.यानंतर त्यांना बारामती येथील सिल्वर जुबिली यासरकारी दवाखान्यात नेण्यात आले . मात्र तो पर्यंत काळंगे यांची प्राणज्योत मालवली होती.
कोरोनाच्या भीतीमुळेच आमच्या रुग्णाला सेवा नाकारली असल्याचे काळंगे यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना त्यांचे बंधू नितीन काळंगे यांनी शोक व्यक्त करीत वैदयकीय सेवा मिळाली नाही म्हणून माज्या भावाचा जीव गेल्याचे सांगितले. अजून कुणाचा जीव जाऊ नये यासाठी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाची लढाई ठीक आहे. मात्र कोरोनामुळे इतर आजाराचं संपून गेले आहेत असे समजून वैदयकीय यंत्रणा काम करीत असेल तर हे योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले.————————————————————