कोरेगाव मूळ : राज्यात शासनमान्य असलेल्या शाळेत मान्यता असलेल्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षणसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली खासगी शाळांकडून पालकांची केली जाणारी लूट थांबणार आहे. राज्यात खोट्या गुणवत्तेच्या प्रक्रियेबरोबरच परीक्षेच्या नावाखाली खासगी शाळांकडून पैसा उकळला जात होता. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत पालकांनी मोठ्या आनंदाने केले आहे. राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनप्रक्रिया सुरु झाली. मुलांवर येणारा परीक्षांचा ताण कमी करणे या उद्देशाने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर राज्याच्या पालकांचा गैरसमज करीत अनेकांच्या पालकांच्या अज्ञानाच्या फायदा घेत व शिक्षकांना बदनाम करीत स्वत:चा गोरखधंदा सुरु केला होता. याबाबत राज्यातील काही पालकांनी माहितीच्या अधिकारात वरिष्ठांकडे माहिती मागितली होती.अशा परीक्षा घेणारे विविध समूह राज्यात आहेत. साधारण परीक्षा फी १५० रुपये, त्यानंतर पुस्तकांची किंमत २०० रुपयांच्या दरम्यान, प्रश्नपत्रिका संच १०० रुपयापर्यंत विकले जाते, सर्व मिळून ५०० रुपयांपर्यंत खर्च आकारण्यात येतो. या परीक्षा पहिलीपासून घेतल्या जातात. अनेकदा मानसशात्रीय विचार, अभ्यासक्रम, शिक्षण क्षेत्रातील सिद्धांत याचा विचार न करता अभ्यासक्रम स्वत:च तयार करणे व अंमलबजावणी करणे होत असते.
खासगी शाळांकडून लूट थांबणार
By admin | Published: January 23, 2017 2:15 AM