शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण, प्रवाशांची होतेय लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:02 AM

स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत.

धनकवडी : प्रचंड प्रवासी वाहतूकसंख्या असणाऱ्या सातारा रस्त्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि ट्रॅव्हल बसेस, कंपनीच्या बसेस स्कूलबस, सिक्स सीटर यांना थांबण्यासाठी निश्चित असे ठिकाण नसल्यामुळे संपूर्ण सातारा रस्ता दुतर्फा अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. यावर महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस यांचे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्यांना धोकादायक ठरते आहे.स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत. या बस थांब्यावर बस थांबताना, तसेच बीआरटी मार्गाचे काम चालू असल्याने या मार्गातून खासगी वाहने जात असल्याने वाहतूककोंडीबरोबरच अपघातजन्य परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. सातारा रस्त्यावर दर दहा मिनिटाला ही परिस्थिती निर्माण होत आहे. खासगी वाहनचालक यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याने त्यांची अरेरावी वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी घेणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणारे हे खासगी वाहतूकदार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहेत. अपघात होईल, मागील गाडी अचानक येऊन धडकेल, याची आजिबात पर्वा केली जात नाही.पुणे - सातारा रस्ता, कात्रज कोंढवा बाह्यवळण महामार्ग, कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग या मार्गावर दिवसभर खासगी लक्झरी बसेसची वर्दळ असते. या बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर कोठेही बेकायदा थांबे घेतात. यामुळे वाहतूककोंडी होते. व्होल्गा चौक, पद्मावती, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्ग या ठिकाणाहून खासगी वाहतूकदारांच्या गाड्या सुटताना प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. कात्रज चौकात शिरवळ, नसरापूर, भोर, सांगली, सातारा, कोल्हापूर-मिरज, कर्नाटककडे जाणारे दुधाचे टँकर, खासगी कंपनीच्या गाड्या, लक्झरी बस, जीप प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरू लागले आहेत. रुंदीकरणानंतर जागेत अतिक्रमणे झाली आहेत.खासगी वाहतुकीचे दर : सणासुदीला प्रवाशांची लूट४जोडून येणाऱ्या सुट्या आणि सणासुदीच्या काळात नोकरीनिमित्ताने शहरात राहणाºया नागरिकांचे गावी जाण्याचे प्रमाण अधिक असते. उपलब्ध गाड्या आणि प्रवासीसंख्या यांच्या व्यस्त प्रमाणाचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची अडवणूक करून जादा दराची मागणी करतात. वास्तविक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकिटाच्या तुलनेत कमाल दीडपट वाढीव दर आकारण्याची परवानगी खासगी वाहतूकदारांना देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी खासगी वाहतूकदार एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट अधिक दर आकारत राज्य सरकारचा नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीSatara areaसातारा परिसर