या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलची निर्विवाद सत्ता आली आहे. या ठिकाणी सतरा सदस्य आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी प्रिया हाडवळे व मीना आवटे यांचा अर्ज आला होता, तर उपसरपंच पदासाठी मारुती घंगाळे व ज्ञानेश्वर शेळके या दोघांचे अर्ज आले होते. दोन्हीही पदांसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सरपंचपदासाठी उमेदवार असलेल्या प्रिया हाडवळे यांना ९ मते पडली, तर मीना दीपक आवटे यांना ८ मते पडली. यामध्ये प्रिया हाडवळे विजयी झाल्या तसेच उपसरपंच पदासाठी घेतलेल्या मतदानात मारूती घंगाळे ७ मते पडली व ज्ञानेश्वर शेळके यांना १० मते पडल्याने ज्ञानेश्वर शेळके विजयी झाले.
यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, वल्लभ शेळके, अविनाश आवटे, जि.के. औटी, ज्ञानेश्वर गटकळ,शिवाजी हाडवळे,अशोक औटी आदी उपस्थित होते.
१्० बेल्हा
राजुरी येथील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.