पुणे : काही पुरस्कार मिळाल्याने त्या व्यक्तींचे कार्य समाजापर्यंत पोहचते. परंतु, कधी एखाद्या अतुलनीय व्यक्तीमुळे सुद्धा पुरस्काराला उंची प्राप्त होत असते. डॉ. के. एच. संचेती यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य तोलामोलाचे आहे. संचेतींमुळे आज पुण्यभूषण पुरस्काराला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संचेती यांच्याबद्दल काढले.त्रिदल आणि पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा २९वा पुण्यभूषण पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत संचेती यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, संचेती यांनी सामान्य जीवनातून असामान्य कार्य उभे केले. ते समाजजीवनातील अलंकार आहेत. त्यांच्याकडून अशीच रुग्ण सेवा घडत राहो. या कार्यक्रमात वसंत प्रसादे, मधुकर ताम्हस्कर, नीरबहादूर गुरुंग, रामदास मोरे, अनिल लामखेडे, श्रीनिवास आचार्य आदी स्वातंत्र्य, गोवा मुक्ती अशा संग्रामात जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
व्यक्तीमुळे पुरस्काराला श्रेष्ठत्व - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 5:57 AM