पुणे : माझ्या कलाकार म्हणून झालेल्या जडणघडणीमध्ये वाचनाचा मोठा वाटा आहे. अनेक लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामुळेच आयुष्यात मला मानसिक स्थिरता, आनंद, समाधान प्राप्त होत आहे. त्यामुळेच हिंदी इंग्रजीसारखेच मराठीतील ही लेखक पुढे यावेत, असे मनापासून मला वाटते. माझ्यासारख्या ३८ टक्के गुण मिळवणा-या व्यक्तीने आज पुस्तकांसाठी पुरस्कार सुरू केला हा गुणांवर उगवलेला सूड होता, अशी मिश्कील टिप्पणी करत प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी पुढच्या वर्षीपासून मराठीतील उत्कृष्ट पर्दापणासाठीदेखील पुरस्कार देण्याची घोषणा केली.पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी बंगळुरू येथील लेखक कल्याणरमण दुर्गादास यांच्या ‘द साँग्ज आॅफ कावेरी’ या इंग्रजी कादंबरीला पहिला ‘अनुपम खेर डेब्यू नॉव्हेल’ पुरस्कार खेर यांच्याच हस्ते प्रदान यशदा येथे प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी आयुष्यातील पुस्तकांचे महत्त्व उलगडले. या कार्यक्रमाला याप्रसंगी ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’च्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू, लेखक कल्याणरमण दुर्गादास, फेस्टिव्हलचे सल्लागार अशोक चोप्रा उपस्थित होते. खेर म्हणाले, की हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पदार्पणातील उत्कृष्ट कादंबºयांना पुरस्कार देण्याचे योजिले होते. परंतु हिंदीतील अपेक्षित नामांकने आली नाहीत. त्यामुळे हिंदी कादंबरीचा पुरस्कार यावर्षी देण्यात आला नाही. हिंदीतील लेखकांनी त्यांची कादंबरी केवळ हस्तलिखित स्वरूपात तयार असली तरी ती परीक्षक समितीला पाठवावी. जेणेकरून त्याचा हिंदी कादंबरीसाठी देण्यात येणाºया पुरस्कारासाठी नामांकन म्हणून विचार करता येईल. तेव्हा उत्कृष्ट पदार्पणातील कलाकारापेक्षा तो उत्कृष्ट पदार्पणातील लेखकासाठी असावा, असे मनोमन वाटले. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या आयुष्यातील पुस्तकांचे महत्त्व विशद करतानाच या पुरस्कारासाठी देशभरातील विविध प्रकाशकांनी ६० हून अधिक कादंबºयांचे नामांकन केले होते. त्यातून राज राव, रवी सुब्रमण्यम आणि सलील देसाई या परीक्षक समितीने ‘द साँग्ज आॅफ कावेरी’ची पुरस्कारासाठी निवड केली. असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.डॉ. प्रभू यांनी खेर यांना पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची विनंती केली. त्यांनी तसे न करता हा फेस्टिव्हल पुण्यात होत असल्याने आपण पुढील वर्षीपासून मराठी भाषेतील उत्कृष्ट पदार्पण कादंबरीलाही पुरस्कार देऊ, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार म्हणजे गुणांवर उगवलेला सूड, पदार्पणातील मराठी कादंबरीसाठी पुरस्कार सुरू करणार : अनुपम खेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:48 AM