नारायणगाव : सरकारच्या नियोजन अभावामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. ती सोडविण्यासाठी सरकारने आयात नियार्तीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केले .
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल फार्मर्स २०१९ कृषी प्रदर्शन सुरु आहेत. त्याप्रसंगी कृषि विद्यान केंद्राने उभारलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि घाडीपात्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील हे बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, माजी सनदी आधिकारी अरविंद झांबम ,सहाय्यक जिल्हाधिकारी खेड तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प आयुष प्रसाद, जिल्हा परिषद पुणेच्या सदस्या आशा बुचके, ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर तसेच मंडळाचे संचालक उपस्थित होते.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की. ‘ उत्तर पुणे जिल्हा हा भाजीपाला उत्पन्नात अग्रेसर असून प्रक्रिया उद्योग आणि मुल्यावर्धनासाठी कृषी पदविधारकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पावधीतच नारायणगावच्या कृषि विज्ञान केंद्राने शेतकºयांसाठी नाविन्यपूर्ण पिकप्रात्यक्षिकाबरोबर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कृषितंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. केंद्राने उभारलेले उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत आहेत.’’ महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी भारतीय शेती ही वातावरणाच्या बदलामुळे चिंतेची ठरत असून संरक्षित शेती फायद्याची ठरणार आहे, असे मत व्यक्त केले. सहाय्यक जिल्हाधिकारी खेड आयुष प्रसाद यांनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, वाहतूक साखळी, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे पुढाकार घेणाºया संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मोठे करायला हवे तर देश प्रचंड गतीने प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला.कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी उत्पादित शेतमालावर प्रक्रिया व त्याची विक्री व्यवस्थापन ही आजची गरज आहे असे सांगितले. कमी पिकवा परंतु दर्जेर्दार पिकवा असा सल्ला त्यांनी शेतकºयांना दिला.राज्यातील २५ ते ३० हजाराहून अधिक शेतकºयांनी विज्ञान केंद्राला भेटी दिल्या आहेत अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली. सूत्रसंचलन सुनील ढवळे, राहुल घाडगे यांनी केले, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रविंद्र पारगावकर यांनी आभार मानले.कृषी विज्ञान केंद्राना आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे आश्वासन खासदार आढळराव पाटील यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार संतोष बांगर,प्रगतशील महिला शेतकरी पुनम नवले, कृषि उद्योजक आदेश काशिद, श्रीकांत वायाळ यांना ग्रामोन्नती कृषि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्या (दि. ६) कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार आहे. कृषी प्रदर्शनानिमित्त्त आयोजित लकी ड्रॉची सोडत काढणार असून भाग्यवान शेतकºयांना शेतीपयोगी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.