शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

नवी रुग्णवाहिका ठरतेय रुग्णांना अडचणीची

By admin | Published: May 30, 2017 2:02 AM

निमगाव केतकी आणि परिसरातील लहान गावे आणि लहान वाड्या-वस्त्यांसाठी जीवनदायिनी ठरलेली आरोग्य विभागाची या आरोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनिमगाव केतकी : निमगाव केतकी आणि परिसरातील लहान गावे आणि लहान वाड्या-वस्त्यांसाठी जीवनदायिनी ठरलेली आरोग्य विभागाची या आरोग्य केंद्रासाठी असलेली जुनी फोर्स कंपनीची अँब्युलन्स (१०८) ही आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच बदलण्यात आली. त्याऐवजी अशोक लेलँड कंपनीची लहान गाडी देण्यात आली आहे. मात्र, ही गाडी रुग्णांना तातडीने आणण्यासाठी वाड्या-वस्त्यावरील कच्च्या रस्त्यांवरून अडचणीची ठरत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.रुग्णांचा कॉल आल्यानंतर वाड्या-वस्त्यांवरील कच्च्या रस्त्याने, पाणंदीच्या रस्त्याने नेण्यासदेखील अडचण येत असल्याचे रुग्णांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते, अशी तक्रार नागरिकांची आहे. या गाडीची जमिनीपासूनची उंची कमी असल्याने ग्रामीण भागात रुग्णवाहिकेला समस्या निर्माण होत आहेत, अशी माहिती अ‍ॅड. सचिन राऊत यांनी दिली. सुरुवातीची रुग्णवाहिका (१०८ नंबर गाडी) ची इंजिन क्षमता जास्त होती. कोणत्याही रस्त्यावरून धावण्यास अडचण येत होती. जमिनीपासून उंच असल्यामुळे रुग्णांना वेळेत सेवा मिळत. त्यामुळे जुनीच गाडी पुन्हा मिळावी, या मागणीसाठी अ‍ॅड. सचिन राऊत, तात्यासाहेब वडापुरे, माणिक भोंग हे गेल्या आठ दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. याबाबत आरोग्य संचालकांनादेखील कळविण्यात आले आहे. त्यांनी गाडी बदलून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. आरोग्य विभागाने याबाबतीत दिरंगाई केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी माहिती सचिन राऊत यांनी दिली.