शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्वातंत्र्योत्तर कालखंडात समस्याच

By admin | Published: November 25, 2014 12:24 AM

प्रतीक्षा : पायाभूत सुविधा व रोजगार निर्मितीसाठी नियोजित प्रयत्नांची गरज

प्रशांत सुर्वे - मंडणगड -डोंगराळ नैसर्गिक संरचनेमुळे विकासाच्या वाटवेर साठ वर्र्षांनतरही मागे राहीलेल्या मंडणगड तालुक्याच्या विकासाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी पायाभुत सुविधांच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मीतीसाठी नियोजीत प्रयत्नांची गरज नेहमीच अधोरेखीत झाली आहे़ घटनकार भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव (आंबडवे) असलेला हा तालुका स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वार्थाने अविकसीत राहीलेला आहे.राजकीय व्यासपाठीवरुन या तालुक्यातून मतदार संघाचे नेतृत्व करेल असे नेतृत्व अपवादानेच निर्माण झाल्याने तालुक्यास कधीही झुकते माप मिळालेले नाही़ तालुक्याचा वापर केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मतांच्या गोळा बेरजेकरिता केला गेल्याने येथे वेगवेगळाा अर्थिक क्रियांच्या माध्यमातून रोजगार निर्मीतीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न झाल्याने आजही येथील तरुण रोजगारासाठी मुंबई व पुण्यासारख्या महानगरांवर विसंबून राहीला आहे़ या तालुक्यातील कर्त्या लोकसंख्येचे रोजगारासाठी स्थलांतर झाल्याने लोकसंख्येत सातत्याने घट होत आहे़ अनैर्सगीक कारणांनी लागलेली गळती थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही़ राजकीय व्यासपीठांवर तर विकासाच्या चर्चेची केवळ गुर्हाळे मांडली जात आहेत़ आजही तालुक्यात चालेलेल्या अर्थिक घडमोडीचां पाया पर्यावरणाला हानी पोहचवील अशा उद्योगांवर अवलंबुन आहे. गोव्यासारखे पर्यावरण देत निर्सगाने या तालुक्यास भरभरुन निसर्ग सौंदर्य दिले आहे, माा राज्यकर्त्यांना कपाळ करंटेपणा दाखवत पर्यावरण अधोगतीचीच पाठराखण केली आहे़ नाही म्हणायला तालुक्यात रोजगार निर्मीती व्हावी यासाठी युती शासनाचे काळात तालुक्यातील पहील्यावहील्या लघु उद्योग सहकारी संस्थेस ( मिनी एम़आय़ डी़सी़) षासनाने मान्यता दिली़ माा षेतक=यांच्या प्रष्नांसह विविध कारणांनी ही वसाहत गेल्या अठरा वर्षात वास्तवात उतरु शकली नाही़ त्यामुळे त्या माध्यमातून रोजगार निर्मीतीची येथील जनतेची अपेक्षा फोल ठरली आहे़ विरोधाला विरोध व श्रेयवादात तालुक्याचा प्रत्येक प्रश्न अडकल्याचे दुर्दैवी चित्र असल्याने नागरीकांच्या जीवीताशी संबंधीत आरोग्याच्या प्रश्नावरही राज्यकर्त्यांना क्रुर चेष्टा मांडल्याने सर्वसोर्इंनी युक्त असे रुग्णालय उभारूनही ते अद्याप जनतेच्या सेवेसाठी सुरु होऊ षकेलले नाही़ षेतक=यांचे प्रष्न सोडवण्यासाठी षासनाने चिंचाळी, तुळषी, पंदेरी, भोळवली, तिडे या ठिकाणी धरणे सुरु केली पण हे प्रकल्पही स्थापनेपासून तीस वषार्नंतरही अपूर्ण आहेत विविध कारणांनी प्रकल्प रखडल्याने धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊच शकला नाही, वास्तवात या पाच धरणातून तालुक्यातील किमीन दोन हजार एकर क्षो सिंचनाखाली येणे आपेक्षीत होते़ अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजांबरोबर षिक्षण व आरोग्य या आधुनीक काळातील मानवाच्या जीवनावष्यक गरजा बनल्या आहेत त्या बाबतीत तालुक्यात म्हणावी अषी प्रगती झालेली नाही आज प्राथमीक ते पदवी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले आहे हे खरे असले तरी रोजगाराभिमुख उच्च षिक्षणक्रमांची सोय येथे उपलब्ध करण्याची गरज आहे़ पर्यटन उद्योगाच्या विकासाची गेली काही वर्शे तालुक्यातील केवळ चर्चा आहे येथील ऐैतिहासीक, सामाजीक व सास्कृतीक पर्यटनस्थळांच्या बलस्थानांबरोबरच कोकणी व येथील लोकजीवनाचे सादरीकरण केल्यास पर्यटन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहेत मात्र कोणतीही कृती होताना दिसून येत नाही़ तालुक्यास लाभलेला सावित्री नदी किनारा व अरबी समुद्र यांचा पर्यटनासाठी वापर करता येईल का याचेही चिंतन सुरु आहे़ लोकप्रतिनिधीकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने चर्चेच्या पलीकडे विकासाची गाडी सरकलेली नाही. मंडणगडसारख्या तालुक्यात विकासाची गती वाढावी यासाठी प्रयत्न केले जावेत असे प्रयत्न अद्याप करण्यात येत नाहीत ही शोकांतिका आहे. पूर्वी या तालुक्यात विकासापासून कोसो दूर असल्याची स्थिती होती. आता परिस्थिती बदलत असली तरीही फार चांगली स्थिती नसल्याने हा संपूर्ण तालुका विकासाच्या प्रतिक्षेत आहे.1तालुक्यातील किल्ले हिंमतगड, किल्ले मंडणगड, आंबडवे, वेळास, पंदेरी लेणी या ठिकाणी पर्यटन उद्योगांच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती करणे़2तालुक्यातील धरण प्रकल्पातील फुकट जात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना करुन देताना रखडलेले धरण प्रकल्प मार्गी लावावेत. पाण्याचा कृषी व अन्य कारणांसाठी वापर होण्याकरिता कालव्यांची निर्मिती करणे गरजेचे़3तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावावा़ 4बिकट अवस्थेत असलेल्या तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज. 5तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय, न्यायालय व क्रीडा संकुलाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावावा़ 6मंडणगड शहराची पंचवीस वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी़ 7शहरातील वाहूतक कोंडी, कचरा व सांडपाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आवश्यक. 8तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांमधून निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी नियोजन व उपायांची गरज़ 9अंगणवाड्या, ग्रामपंचायती, तलाठी, मंडल कार्यालये व आरोग्य उपकेंद्रांसाठी हक्काच्या इमारती उपलब्ध करुन देण्यात याव्यात़10महावितरणचे सडलेले व गंजलेले खांब बदलण्यात यावेत. एस़ टी़ महामंडळाचा कारभार अधिकाधिक प्रवासाभिमुख व्हावा. 11उच्च तंत्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात.