शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

डीएसकेंची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 6:20 AM

बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार...

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार आता पोलिसांनी त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी मंगळवारी दिवसभर या कामात व्यस्त होते.आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डीएसके यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी जिल्हाधिका-यांकडे दिली असून त्यांनी मावळ प्रांत यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी डीएसके यांच्या २४६ मालमत्तांचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला असून येत्या काही दिवसांत त्याची आधीसूचना निघण्याची शक्यता आहे. डीएसके यांच्या या ६ आलिशान मोटारी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी मावळ प्रांत कार्यालयाला दिली आहे. यापुढील कारवाई त्यांच्यामार्फत होणार आहे.डी़ एस़ कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांची मंगळवारी दिवसभर पोलिसांनी प्रामुख्याने ठेवीदारांनी दिलेले पैसे हे नेमके कोठे गेले, याविषयी विचारणा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या काही माहितीच्या आधारे यासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेPoliceपोलिस