घोडेगाव : शेतातील पीक पाहणीची नोंद आपल्या सातबाऱ्यांवर असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो यासाठी आंबेगावमधील शेतकऱ्यांनी अतिशय सोप्या पध्दतीने मोबाइलवर करता येणाऱ्या ऑनलाइन पीक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन प्रांत अधिकारी सारंग कोडूलकर यांनी केले आहे.
पिंपळगांव घोडे (ता. आंबेगाव) येथे हिराबाई काळे यांच्या बांधावर जाऊन आंबा पिकाची ऑनलाइन पीक पाहणी नोंद करण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडूलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सारंगा कोडूलकर यांनी सांगितले की, शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी नोंदीमध्ये शेतकरी आपल्या मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून स्वत:ची पीक पाहणी स्वत: करू शकतात. यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल हे मदत करतील. यावेळी प्रांत अधिकारी यांनी मोबाइलवर कशा पध्दतीने पीक पाहणी नोंदवावी, हे देखील समजून सांगितले.
--
फोटो क्रमाक : १८घोडेगाव पीक पाहणी
फोटो ओळी : पिंपळगांव घोडे येथे हिराबाई काळे यांच्या शेताच्या बांधावर पीक पाहणी नोंद करण्यासाठी उपस्थित सारंग कोडूलकर, रमा जोशी, जालिंदर पठारे.