इंदापूर : भगवान महावीर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी सर्व संप्रदाय एकत्र झाले होते. महिलांचा लक्षवेधी सहभाग होता.जैन धर्मीयांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त जैन संप्रदायांनी एकत्रितरीत्या भगवान महावीरांचा जयघोष करत त्यांच्या प्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक काढली. मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष भरत शहा, बाबा चौकात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील तळेकर, प्रमोद राऊत, दत्ता राऊत यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. भगवान महावीरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर तीर्थक्षेत्रपासून सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीची सांगता तीन तासांनंतर पुरातन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात करण्यात आली. शांतिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा हुमड जैन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे विश्वस्त जीवंधर दोशी, श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मूर्तिपूजक मंदिर ट्रस्टचे नरेंद्र गांधी, पारसमल बागरेचा, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, जैन डॉक्टर संघटनेचे डॉ. सागर दोशी, डॉ. ए. के. मेहता, डॉ. आशिष दोभाडा, वर्धमान स्थानकवासी जैन संप्रदायाचे जवाहर बोरा, संजय बोरा, सुनील बोरा यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला.भगवंत प्रतिमेस पालखीत विराजमान करण्याचा व पालखी उचलण्याचा मान अरुण दोशी व संजय दोशी यांना मिळाला. भगवान महावीर पथ, जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बालाजी पथ, शिवाजी पथ, मुख्य बाजारपेठ, नेहरू चौक, संभाजी चौकातून मिरवणुकीचा समारोप श्री पार्श्वनाथ मंदिरामध्ये झाला. मिरवणुकीत नीलेश मोडासे, नितीन शहा, मोहन दोशी, संदीप दोशी, श्रेणिक कासार, महावीर शहा, भारत दोभाडा, अरविंद गांधी, प्रतीक गांधी, उत्कर्ष दोशी, महेंद्र गुंदेचा, पिंटू मेहता, पीयूष बोरा, सुभाष गांधी, नंदकुमार मेहता, प्रकाश बलदोटा आदी सहभागी झाले होते. रौनक बोरा, अभिषेक दोशी, मनोज शहा यांनी पाणी व साखर वाटप केले. मिरवणुकीत माजी नगरसेवक मिलिंद दोशी यांनी भगवंताचा जयघोष केला. मंदिरात शेखर दोशी व संदीप शहा यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेवर विधिवत अभिषेक करण्यात आला. सचिन पंडित व शांतिनाथ उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
भगवान महावीरांच्या प्रतिमेची इंदापुरात मिरवणूक
By admin | Published: April 10, 2017 2:01 AM