फाल्गुन महिन्यातील खंडोबाच्या सेवेकरीचा पारंपरिक मान धामणीतील समस्त बारा बलुतेदार मंडळीचा असतो. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा साध्या पध्दतीने पालखी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. लोणी व धामणीच्या पंचरास मंडळीच्या पारंपरिक ताफ्यातील हालगी, ढोलकी, सनई, संबळ, तुतारी व ताशाच्या निनादात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. देवाच्या पालखीच्या मिरवणुकीत बलुतेदार मंडळी व ग्रामस्थ कोरोनामुळे मास्क लावून सहभागी झाले होते. पालखीच्या पुढे फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
देवाची पालखी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर खंडोबाची व भैरवनाथाची आरती करण्यात आली.
या वेळी गावातील श्री महादेव मंदिर व श्री भैरवनाथ मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम कोरोनामुळे थांबलेले आहे. ते जीर्णोध्दाराचे काम त्वरेने सुरु करुन महादेव मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व दोन्ही मंदिराच्या शिखराचे कलशारोहन करण्याचा व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय यावेळी देवाचा भंडारा उधळून घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थ व बलुतेदार मंडळीनी सांगितले. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आवश्यक काळजी घेण्याचे व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
देवाच्या मिरवणुकीत सुधाकर जाधव, सरपंच सागर जाधव, गणपत भांडारकर, सीताराम जाधव (टेलर), संतोष पंचरास, गणेश रोकडे, बाबूराव सोनवणे,बाबूरावतात्या बोऱ्हाडे, सुरेश पवार, सीताराम जाधव (वाघे) दिनेश जाधव,माऊली जाधव(वाघे) दिनकर रोकडे,राजेंद्र रोकडे,सुनिल सासवडे, ज्ञानेश्वर बोर्हाडे,राजेश भगत,शांताराम भगत,नामदेव भगत, सतीष पंचरास, मच्छिद्र पंचरास,गजानन गाडेकर, गणेश ससाणे, अरुण सांळुके, सिलेमान इनामदार, सोमनाथ सोनवणे,पांडुरंग पंचरास,दिनेश बोर्हाडे,भाऊ पंचरास ,धोंडूनाना जाधव,संतोष देशमुख
चिंतामण जाधव, संजय दहिवाळ, अकबर इनामदार, शिवराम पंचरास, पमाजी पंचरास, वामनराव शिंदे, वसंत बोऱ्हाडे, परशुराम बोऱ्हाडे, पांडुरंग ससाणे, प्रभाकर पंचरास, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते.