रविवारी, दि. १५ रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर काकडे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पुढे बोलताना सरपंच काकडे म्हणाल्या की, नीरा शहरातील विविध समस्यांचे निराकरण लवकरच होणार असून, लोकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर विश्वास ठेवत, अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौकादरम्यानचा रस्ता रुंदीकरण करताना दुतर्फा प्रशस्थ फूटपाथही करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. फूटपाथवरून चालणे हा नागरिकांचा अधिकारी आहे. तो नागरिकांना देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. त्यासाठी कडक धोरण अवलंबावे लागले, तर त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन गंभीर पावले उचलण्यास सक्षम आहे. आता हा रस्ता सुशोभीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी या फूटपाथवर ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावली जात आहेत. नव्याने लावलेल्या झाडांना व्यावसायिकांनी पाणी घालावे व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
व्यावसायिकांनी स्वतःहून फूटपाथ मोकळे करावेत : तेजश्री काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:14 AM