पुणे : 'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एम. सी. ई. सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख, उपस्थित होते. आझम कॅम्पसतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये 'काव्य वाचन स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा', 'नाटक स्पर्धा', 'मराठी चित्रपट'शो, 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, 'मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा', 'प्रश्नमंजुषा स्पर्धा', 'महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा', सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवार, दि. ९ जानेवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी मातीचे खुले मैदान येथे 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळाव्या'चे आयोजन, बुधवार, दि. १० जानेवारी 'महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा' असेम्ब्ली हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत, गुरुवार, दि. ११ जानेवारी रोजी आर्ट्स अॅकॅडमी आवार येथे 'मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा' सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, कनिष्ठ आणि वरिष्ठ गटासाठी 'प्रश्नमंजुषा स्पर्धा' शुक्रवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ग्रीन आॅडिटोरियम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, शनिवार, दि. १३ जानेवारी चिकणमाती आणि कथाकथन सत्र 'ग्रीन आॅडिटोरियम', आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मराठी संवर्धन पंधरवडा सांगता कार्यक्रम असेम्ब्ली हॉल येथे हॉल होणार आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 4:56 PM
'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्दे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन'काव्य वाचन स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा', 'नाटक स्पर्धा', 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा आदी कार्यक्रम