पुणे : वाइन शॉपी, बिअर शॉपीवर लावण्यात आलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी काढले आहेत़ त्याची अंमलबजावणी सध्या शहरातही सुरू असून, बहुतांश ठिकाणच्या वाइन शॉपीवरील जाहिराती काढून टाकण्यात येत आहेत़या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याच्या तपासणीसाठी येत्या सोमवारपासून जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़राज्यातील अनेक वाइन शॉपी, बिअर शॉपीवर मद्याच्या मोठमोठ्या जाहिराती लावण्यात येत असल्याचे दिसून येते़ प्रवेशद्वारावर ग्लोर्इंग साईन बोडर््स, फ्लेक्स, निआॅन साईन्स इत्यादी द्वारा बॅ्रण्डच्या जाहिरातवजा फलक लावलेले दिसतात़ यापुढे दुकानांच्या प्रवेशद्वारावर अशा कोणत्याही जाहिराती लावण्यास बंदी घालण्यात आली आहे़ दुकानाच्या प्रवेशद्वारावर केवळ ६०/९० सेंमी आकाराचा फलक लावणे बंधनकारक आहे़ या फलकावर दुकानदाराचे नाव, त्यांचा पत्ता, लायसन्स क्रमांक आणि दुकान सुरू करण्याची व बंद करण्याच्या वेळा एवढाच मजकूर लावण्याचे आदेशात म्हटले आहे़
मद्यविक्री ठिकाणी जाहिरात बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 7:07 AM